Nagpur

नागपूर पोलिस विभागात अंतर्गत फेरबदल; ५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या


Advertisement

नागपूर : शहर पोलीस दलात अंतर्गत फेरबदल करत पाच पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी जारी केले. हे बदल नियमित प्रशासकीय प्रक्रियेचा भाग असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या फेरबदलानुसार, धंतोली पोलीस ठाण्यात कार्यरत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापूरेंची हुदकेश्वर पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर लकडगंज येथील पोलीस निरीक्षक साईनाथ रामोड यांना धंतोली पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

Gold Rate
Mar 19 2026 – Time 10.46 Hrs

Gold 24 KT
₹ 1,53,800 /-

Gold 22 KT
₹ 1,43,000 /-

Silver/Kg
₹ 2,45,300 /-

Platinum
₹ 90,000/-

Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हुदकेश्वर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांची बदली पोलीस कंट्रोल रूममध्ये करण्यात आली आहे. कोराडी येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोपट धायतोंडे यांची आर्थिक गुन्हे शाखेत (Economic Offences Wing) नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, कळमना येथील पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांना कोराडी पोलीस ठाण्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

दरम्यान, या बदल्या नियमित स्वरूपाच्या असून आगामी काही दिवसांत आणखी फेरबदल होण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.

GET YOUR OWN WEBSITE

FOR ₹9,999

Domain & Hosting FREE for 1 Year

No Hidden Charges

Advertisement

Advertisement





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)