Nagpur

महिला आरक्षण विधेयकाच्या विशेष अधिवेशनासाठी देशभरातील नामांकित महिला कलाकारांना निमंत्रण


Advertisement

नवी दिल्ली – महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करण्यासाठी संसदेत 16 आणि 17 एप्रिल 2026 रोजी दोन दिवसीय विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार होण्यासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने देशभरातील 110 प्रख्यात महिला कलाकारांना विशेष निमंत्रण दिले होते.

महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या विधेयकाच्या पारितीच्या पार्श्वभूमीवर पद्म पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार तसेच इतर प्रतिष्ठित सन्मानांनी गौरविण्यात आलेल्या महिला कलाकारांची उपस्थिती लक्षणीय ठरली.

Gold Rate
Apr 18 2026 – Time 10.30Hrs

Gold 24 KT
₹ 1,54,200 /-

Gold 22 KT
₹ 1,43,500 /-

Silver/Kg
₹ 2,59,800/-

Platinum
₹ 90,000/-

Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने सहभागी राज्यांमधील 20 नामांकित महिला कलाकारांची निवड करून त्यांना या अधिवेशनासाठी विशेष आमंत्रित केले होते.

यामध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित झालेल्या शैलेश श्रीवास्तव, लतासना देवी, राजेश्री शिर्के, आरती अंकलीकर, अमला शेखर पाटील, प्रेमला कौतिकराव सूर्यवंशी यांच्यासह मनीषा साठे, पौलोमी मुखर्जी, जयंती माला मिश्रा, अंशुमाला पाटील, कलाश्री बर्वे, दीपाली विचारे, अनुराधा पाल, सीमा कौशिक, तनु कजारिया, डॉ. तनुजा नाफडे, आभा अवती, रोशन दाते, निशा त्रिवेदी आणि तेजश्री बाभुळगावकर यांचा समावेश होता.

या सर्व महिला कलाकारांनी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संचालिका आस्था कार्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संसद अधिवेशनात सहभाग नोंदवला.

महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर महिलांची उपस्थिती ही महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचे प्रतीक मानली जात असून, या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे.

GET YOUR OWN WEBSITE

FOR ₹9,999

Domain & Hosting FREE for 1 Year

No Hidden Charges

Advertisement

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)