Nagpur

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; दत्तक मातांनाही १२ आठवड्यांची मातृत्व रजा


Advertisement

नवी दिल्ली : महिलांच्या हक्कांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय देत  सुप्रीम कोर्टाने  दत्तक मातांना १२ आठवड्यांची मातृत्व रजा देण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे कामकाजी महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यापूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाच्या वयानुसार मातृत्व रजेसंदर्भात काही मर्यादा होत्या. मात्र आता न्यायालयाने या अटी रद्द करत, मुलाचे वय कोणतेही असो, दत्तक मातांनाही मातृत्व रजेचा लाभ मिळावा असे स्पष्ट केले आहे.

न्यायालयाने आपल्या निरीक्षणात म्हटले आहे की, मातृत्व रजा ही केवळ प्रसूतीनंतरच्या शारीरिक विश्रांतीपुरती मर्यादित नसून, आई आणि मुलामधील नातं दृढ करण्यासाठीही ती तितकीच आवश्यक आहे. दत्तक मातांनाही आपल्या मुलासोबत वेळ घालवण्यासाठी आणि भावनिक नातं निर्माण करण्यासाठी ही रजा तितकीच गरजेची असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले.

तसेच, दत्तक मातांसाठी असलेली भेदभाव करणारी जुनी तरतूदही न्यायालयाने रद्द केली आहे. सर्व मातांना समान वागणूक मिळावी, असा स्पष्ट संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे.

या निर्णयामुळे कामकाजी महिलांना मोठा आधार मिळणार असून, दत्तक घेण्याबाबतही समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

GET YOUR OWN WEBSITE

FOR ₹9,999

Domain & Hosting FREE for 1 Year

No Hidden Charges

Advertisement

Advertisement





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)