Nagpur

स्नेहांगण “दिव्यांग” मुलांच्या शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात


Advertisement

नागपूर : स्नेहांगण दिव्यांग मुलांच्या शाळेत, मातृ सेवा संघ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

यावेळी शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित प्रभावी भाषणे देत त्यांच्या कार्याचा गौरव केला व त्यांचे विचार उपस्थितांसमोर मांडले.

Gold Rate
Apr 17 2026 – Time 10.30Hrs

Gold 24 KT
₹ 1,53,200 /-

Gold 22 KT
₹ 1,42,500 /-

Silver/Kg
₹ 2,51,400/-

Platinum
₹ 90,000/-

Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार सचिन द्रवेकर , तसेच गौरव जयचित, नागेश वाघरूकर, ॲड.प्रशांत जगताप, सोनाली बुंदे, मुकेश हेडाऊ, प्रा. मृणालि देशमुख उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना शिक्षण, समता आणि सामाजिक बांधिलकी याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी काही विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या वेशभूषेत सादरीकरण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यानंतर केक कापून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मातृसेवा संघाच्या शिक्षिका सोनाली वाढीवे यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सपना गेडाम, मंगला गजभिये, कुणाल टेंभरे, प्रगती लोणारकर , दीपिका पाटील यांनी मेहनत घेतली आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

GET YOUR OWN WEBSITE

FOR ₹9,999

Domain & Hosting FREE for 1 Year

No Hidden Charges

Advertisement

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)