Nagpur

नागपुरात पोलिसावर जीवघेणा हल्ला; कारच्या बोनटवर २५० मीटर फरफटत नेल्याची थरारक घटना!


नागपूर : शहरातील सक्करदरा परिसरात नाकाबंदी दरम्यान वाहतूक पोलिसावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहन तपासणीसाठी थांबण्याचा इशारा दिल्यानंतर कार चालकाने पोलिस कर्मचाऱ्यालाच धडक देत तब्बल २५० मीटरपर्यंत कारच्या बोनटवर फरफटत नेल्याने शहरात खळबळ उडाली आहे. जखमी पोलिस कर्मचाऱ्यावर उपचार सुरू असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी मध्यरात्री साडेअकरा ते पावणे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडे प्लॉट चौक परिसरात वाहतूक पोलिसांची नाकाबंदी सुरू होती. त्यावेळी एमएच-४९ बीके-६२१२ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या होंडा सिटी कारला थांबण्याचा इशारा देण्यात आला.

Gold Rate
May 14- 2026 – Time 10.30Hrs

Gold 24 KT
₹ 1,63,000 /-

Gold 22 KT
₹ 1,51,600 /-

Silver/Kg
₹ 2,92,400/-

Platinum
₹ 88,000/-

Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मात्र चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगात कार पुढे दामटली आणि वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार हर्षद इंदल वासनिक यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर आरोपी चालकाने पोलिस कर्मचाऱ्याला कारच्या बोनटवर सुमारे २५० मीटरपर्यंत फरफटत नेत गुरुदेव नगर रोडच्या दिशेने पलायन केले. या घटनेत हवालदार वासनिक यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि वाहन क्रमांकाच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख ३२ वर्षीय प्रसन्नजीत राज रत्न रामटेके, रा. बहादुरा अशी झाली आहे. विशेष म्हणजे आरोपी हा निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात खुनाच्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी पोलिस कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Advertisement

GET YOUR OWN WEBSITE

FOR ₹9,999

Domain & Hosting FREE for 1 Year

No Hidden Charges

Advertisement

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)