Nagpur

मुंबईत लाइव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या अतिसेवनाने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू; ५ जण अटकेत


मुंबई : गोरेगाव येथील नेस्को संकुलात पार पडलेल्या लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान घडलेल्या गंभीर प्रकाराने शहर हादरले आहे. ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी नेस्कोशी संबंधित अधिकाऱ्यांसह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शनिवारी रात्री झालेल्या या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणी सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान काहींनी मद्य व अमली पदार्थांचे सेवन केल्याने त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर संबंधितांना तातडीने विविध रुग्णालयांत हलवण्यात आले.

जमुनालाल कॉलेजचे एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाचा गोरेगावमधील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एका तरुणीचा खासगी रुग्णालयात जीव गेला. आणखी एक तरुणी सध्या गंभीर अवस्थेत उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक चौकशीत नेस्कोच्या कार्यक्रम व्यवस्थापनातील काही अधिकाऱ्यांचा सहभाग उघड झाल्याने पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांच्या रक्त नमुन्यांची तपासणी सुरू असून अहवालानंतर अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून माहिती देण्यास विलंब होत असल्याने विविध स्तरांतून नाराजी व्यक्त होत आहे. तसेच, मुंबईतील ड्रग्स नियंत्रण यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

The original article was published on %%sitedesc%%. Read more: %%permalink%%

Please follow and like us:
error20
fb-share-icon584226
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)