Nagpur

महाराष्ट्रात नागपूर पोलिसांचा दबदबा कायम; उत्कृष्ट तपास कार्यासाठी राज्यस्तरीय सन्मान!


नागपूर : गुन्हे उकलण्यात दाखवलेली तत्परता, अचूक नियोजन आणि प्रभावी तपासपद्धतीच्या जोरावर नागपूर शहर पोलिसांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा आपली वेगळी छाप उमटवली आहे. राज्य पोलीस दलातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न’ हा सन्मान यंदा नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या नावे झाला आहे. या यशामुळे नागपूर पोलिसांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

मुंबई येथे पोलीस महासंचालक कार्यालयात पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या उल्लेखनीय तपासकार्याचा सन्मान करण्यात आला.

Gold Rate
May 14- 2026 – Time 10.30Hrs

Gold 24 KT
₹ 1,63,000 /-

Gold 22 KT
₹ 1,51,600 /-

Silver/Kg
₹ 2,92,400/-

Platinum
₹ 88,000/-

Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

काही महिन्यांपूर्वी सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजनगर परिसरात तब्बल ३ कोटी रुपयांच्या घरफोडीची धक्कादायक घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत असताना, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वेगाने तपासाची सूत्रे हलवत दोन सराईत आरोपींना अटक केली.


या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात पोलिसांना यश आले. तपास प्रक्रियेत API राजाभाऊ जाधव, API सचिन भोंडे आणि हेड कॉन्स्टेबल रवी अहिर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या बारकाईच्या तपासामुळे हा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला.

नागपूर पोलिसांच्या या कामगिरीची दखल पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागासह राज्य पोलीस मुख्यालयानेही घेतली आहे. या तपासामुळे नागपूर पोलिसांनी इतर पोलीस यंत्रणांसमोर एक प्रभावी उदाहरण निर्माण केले आहे.

नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. कर्तव्यदक्षता आणि तपासातील गुणवत्ता यामुळेच नागपूर पोलिसांनी राज्यात वेगळी ओळख निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.

या गौरवामुळे नागपूर शहराचा सन्मान राज्यभर उंचावला असून, नागरिकांकडूनही पोलीस दलावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Advertisement

GET YOUR OWN WEBSITE

FOR ₹9,999

Domain & Hosting FREE for 1 Year

No Hidden Charges

Advertisement

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)