Nagpur

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महावितरण आणि महानिर्मितीतर्फे विनम्र अभिवादन


नागपूर :- भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त महावितरणच्या वतीने त्यांना मंगळवारी नागपुरात विनम्र अभिवादन करण्यात आले. ‘विश्वरत्न’, ‘महानायक’ आणि ‘प्रकांड पंडित’ अशा विविध पैलूंनी ज्यांचे व्यक्तिमत्व अजरामर आहे, अशा डॉ. आंबेडकरांच्या जयंतीदिनी महावितरणच्या विविध कार्यालयांमध्ये उत्साहात आदरांजली अर्पण करण्यात आली.

काटोल मार्गावरील महावितरणच्या ‘विद्युत भवन’ या प्रादेशिक कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आपल्या मनोगतात दिलीप दोडके यांनी डॉ. बाबासाहेबांच्या उत्तुंग कार्यातून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडण्याचे आवाहन केले. कार्यक्रमादरम्यान कनिष्ठ अभियंता विशाल जयस्वाल यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

या प्रसंगी महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय वाकडे, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अतुल राऊत, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश जाधव, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) शुधीर टेकाम, कार्यकारी अभियंता अजीत जिचकार, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महानिर्मितीचे अधीक्षक अभियंता किशोर सूर्यवंशी व सतीश भानसे, कार्यकारी अभियंता सागर इंगळे व श्रीराम बोरकर, उपविधी अधिकारी कुणाल बारामासे, वरिष्ठ व्यवस्थापक अखिलेश जोशी यांच्यासह दोन्ही कंपन्यांमधील मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ. आंबेडकरांना नमन केले.

The original article was published on %%sitedesc%%. Read more: %%permalink%%

Please follow and like us:
error20
fb-share-icon584226
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)