Nagpur

नागपुरात क्रिप्टोकरन्सीच्या आमिषाने १७ लाखांची ऑनलाईन फसवणूक; पश्चिम बंगालमधून आरोपीला अटक


Advertisement

नागपूर : स्वस्त दरात क्रिप्टोकरन्सी मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची तब्बल १७ लाख ३२ हजार ६१२ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आरोपीला नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने पश्चिम बंगालमधील आसनसोल येथून अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या सायबर फसवणुकीमागील संपूर्ण रॅकेटचा तपास सुरू आहे.

ही घटना तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. टिमकी परिसरातील रहिवासी रोहित जाघरे यांना ऑक्टोबर २०२५ मध्ये यूएसडीटीसह इतर क्रिप्टोकरन्सी कमी दरात उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. सुरुवातीला ओळखीच्या व्यक्तीमार्फत व्यवहार करण्यात आला. त्यानंतर आरोपीने थेट आपल्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. विश्वास ठेवून फिर्यादीने १७ लाख ३२ हजार ६१२ रुपये आरोपीच्या खात्यात वर्ग केले. मात्र, त्यानंतर ना क्रिप्टोकरन्सी मिळाली, ना पैसे परत करण्यात आले.

Gold Rate
July 10 ,2026 – Time 10.30Hrs

Gold 24 KT
₹ 1 44,400 /-

Gold 22 KT
₹ 1,34,000 /-

Silver/Kg
₹ 2,25,100/-

Platinum
₹ 88,000/-

Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने समांतर तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलाब पार्थ सरकार (रा. आसनसोल, पश्चिम बंगाल) याचा माग काढण्यात आला. विशेष पथकाने पश्चिम बंगालमध्ये जाऊन त्याला अटक करून नागपुरात आणले.

न्यायालयाने आरोपीला १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय असून, सायबर फसवणुकीच्या संपूर्ण नेटवर्कचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.

Advertisement

Advertisement

GET YOUR OWN WEBSITE

FOR ₹9,999

Domain & Hosting FREE for 1 Year

No Hidden Charges

Please follow and like us:
error20
fb-share-icon584226
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)