Nagpur

नागपुरात उड्डाणाआधीच इंडिगो विमानात इंधन गळती; वैमानिकाच्या दक्षतेमुळे मोठा अपघात टळला


Advertisement

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे रविवारी मोठी दुर्घटना टळल्याची घटना घडली. गोव्याकडे जाण्यासाठी सज्ज असलेल्या IndiGoच्या विमानातून अचानक इंधन गळती सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, उड्डाणासाठी धावपट्टीकडे सरकत असताना विमानाच्या पुढील चाकाजवळून इंधन गळत असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखत वैमानिकाने तात्काळ विमान थांबवले आणि ते परत पार्किंग एरियात आणले. त्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितरीत्या खाली उतरविण्यात आले. या तत्पर निर्णयामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.

सध्या संबंधित विमान नागपूर विमानतळावरच थांबविण्यात आले असून तांत्रिक तपासणी सुरू आहे. दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत हे विमान उड्डाणासाठी उपलब्ध होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Gold Rate
Mar 17 2026 – Time 10.23Hrs

Gold 24 KT
₹ 1,58,300/-

Gold 22 KT
₹ 1,47,200 /-

Silver/Kg
₹ 2,62,100/-

Platinum
₹ 90,000/-

Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गोवा फ्लाइटमुळे इतर उड्डाणांवर परिणाम
या बिघाडाचा फटका इतर उड्डाणांनाही बसला. गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची व्यवस्था करण्यासाठी कंपनीने मुंबईकडे जाणारे विमान वळविले. त्यामुळे मुंबईच्या प्रवाशांना मोठ्या विलंबाचा सामना करावा लागला. नियोजित वेळेपेक्षा अनेक तास उशिराने हे उड्डाण पार पडले.

दरम्यान, पर्यायी उड्डाणांची कमतरता असल्याने काही प्रवाशांची गैरसोय झाली. परिस्थिती हाताळण्यासाठी अखेर कंपनीने मोठ्या क्षमतेचे विमान मागवून दोन्ही फ्लाइटमधील प्रवाशांना एकत्रितपणे रवाना केले. यानंतर उशिरा रात्री सर्व प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पाठविण्यात आले.

GET YOUR OWN WEBSITE

FOR ₹9,999

Domain & Hosting FREE for 1 Year

No Hidden Charges

Advertisement

Advertisement





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)