Nagpur

नागपुरात काँग्रेसचे नवे नेतृत्व जाहीर; शहराध्यक्षपदी प्रफुल्ल गुडधे यांची निवड!


नागपूर : महाराष्ट्रातील काँग्रेस संघटनेत मोठे संघटनात्मक बदल करत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (AICC) जिल्हा काँग्रेस कमिटींच्या पुनर्रचनेला मंजुरी दिली आहे. या निर्णयांतर्गत नागपूर शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल गुडधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही घोषणा करण्यात आली आहे. “संगठन सृजन अभियान” अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षकांनी सखोल आढावा घेत कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांशी चर्चा करून अहवाल सादर केला होता. त्यानंतर वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनंतर या नियुक्त्या निश्चित करण्यात आल्या.

Gold Rate
May 14- 2026 – Time 10.30Hrs

Gold 24 KT
₹ 159,100 /-

Gold 22 KT
₹ 1,48,000 /-

Silver/Kg
₹ 2,70,400/-

Platinum
₹ 88,000/-

Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रफुल्ल गुडधे हे नागपूर काँग्रेसमधील सक्रिय आणि जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे शहर काँग्रेस संघटनेला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

नागपूर काँग्रेससमोर नवी दिशा-
-बूथ स्तरावर संघटन मजबूत करण्यावर भर
-तरुण कार्यकर्त्यांना संधी
-जनतेच्या प्रश्नांवर अधिक सक्रिय भूमिका
आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारीला वेग
या नियुक्तीमुळे नागपूर शहर काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाखाली संघटनात्मक मजबुती आणि राजकीय सक्रियता वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Advertisement

GET YOUR OWN WEBSITE

FOR ₹9,999

Domain & Hosting FREE for 1 Year

No Hidden Charges

Advertisement

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)