Nagpur

महिला उमेदवारांसाठी अखेरची हाक; २४ एप्रिलला नागपूर पोलीस भरतीची अंतिम मैदानी चाचणी


नागपूर : पोलीस आयुक्तालय नागपूर शहर अंतर्गत सुरू असलेल्या कारागृह शिपाई भरती प्रक्रियेत महिला उमेदवारांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी २४ एप्रिल २०२६ रोजी अंतिम संधी जाहीर करण्यात आली असून, संबंधित उमेदवारांनी सकाळी ४.३० वाजता टाकळी येथील पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

१५ ते २४ एप्रिलदरम्यान ही प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, काही उमेदवारांना दिलेल्या तारखांना उपस्थित राहणे शक्य झाले नाही, तर काहींनी मुदतवाढ मागितली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने एकदाच ही अतिरिक्त संधी उपलब्ध करून दिली आहे.

प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, २४ एप्रिलनंतर कोणत्याही उमेदवारासाठी वेगळी चाचणी घेतली जाणार नाही. त्यामुळे सर्व पात्र उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहणे अत्यावश्यक आहे.

वैद्यकीय कारणांमुळे अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांनी अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याचे तंदुरुस्ती प्रमाणपत्र सोबत आणणे बंधनकारक राहील. तसेच, अर्जात नमूद केलेल्या कारणांची पडताळणी करूनच पुढील चाचणीत सहभागी होण्याची परवानगी दिली जाईल.

याशिवाय, इतर भरती प्रक्रियेत हजर असल्याचा लेखी पुरावा आणि प्रवेशपत्रे सोबत ठेवणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) दीपक अग्रवाल यांच्या निर्देशानुसार ही माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून, सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

The original article was published on %%sitedesc%%. Read more: %%permalink%%

Please follow and like us:
error20
fb-share-icon584226
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)