Nagpur

नागपुरात आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल; नागरिकांना खबरदारीचे आवाहन


Advertisement

नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका आणि रॅलींचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे संविधान चौक आणि त्याच्या आसपासच्या परिसरात वाहतुकीवर तात्पुरते निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.

१३ एप्रिल २०२६ रोजी रात्री १० वाजल्यापासून ते १६ एप्रिल २०२६ रोजी पहाटे २ वाजेपर्यंत संविधान चौक मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळे येऊ शकतात. या काळात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित मार्ग काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

Gold Rate
Apr 132026 – Time 10.30Hrs

Gold 24 KT
₹ 1,51,300 /-

Gold 22 KT
₹ 1,40,700 /-

Silver/Kg
₹ 2,40,600/-

Platinum
₹ 90,000/-

Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागरिकांनी या काळात पर्यायी मार्गांचा वापर करून आपला प्रवास करावा, तसेच अनावश्यक विलंब टाळण्यासाठी वेळेचे नियोजन करून किमान एक तास आधी घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही माहिती लोहित मतानी, पोलीस उपआयुक्त (वाहतूक) नागपूर शहर यांनी दिली आहे.

GET YOUR OWN WEBSITE

FOR ₹9,999

Domain & Hosting FREE for 1 Year

No Hidden Charges

Advertisement

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)