Nagpur

गणेशपेठ आत्महत्या प्रकरण: हुंडाबळीच्या छळामुळे पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल


नागपूर : शहरातील गणेशपेठ परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने खळबळ उडाली आहे. हुंड्याच्या कारणावरून सतत छळ झाल्यामुळे एका विवाहित तरुणीने आत्महत्या केल्याचा आरोप असून, या प्रकरणी पतीसह सासरच्या कुटुंबीयांविरुद्ध गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मृत तरुणी सना अंजुम अकील खान (वय २६) हिचा विवाह २०२४ मध्ये शोएब उर्फ सैफ अय्यूब खान (वय ३०) याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर काही काळातच सना हिला पती, सासरे नसीम अय्यूब खान (वय ५७), सासू आणि नणंद समीना उर्फ सोनी अनीस खान (वय ३५) यांच्याकडून शारीरिक व मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचे तपासात समोर आले आहे.

माहितीनुसार, माहेरकडून पैशांची मागणी करून तिच्यावर सातत्याने दबाव टाकण्यात येत होता. या त्रासाला कंटाळून सना हिने ७ एप्रिल २०२६ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले.

प्रारंभी हा प्रकार अपघाती मृत्यू म्हणून नोंदवण्यात आला होता. मात्र, पुढील तपासात हुंड्यासाठी होणारा छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१ अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, आरोपींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

The original article was published on %%sitedesc%%. Read more: %%permalink%%

Please follow and like us:
error20
fb-share-icon584226
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)