Nagpur

महसूल मंत्री बावनकुळे यांच्यासह कुटुंबावर आरोप करणाऱ्या व्हिडिओप्रकरणी गुन्हा


Advertisement

नागपूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सोशल मीडियावर फिरणाऱ्या कथित बदनामीकारक व्हिडिओप्रकरणी नागपुरातील कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथील रमेश्वर शिवाजी दरेकर (वय ३९) यांना आरोपी करण्यात आले आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दरेकर यांनी “दैনিক बुलंद शक्ती” या फेसबुक पेजवरून एक सविस्तर व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये मंत्री बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर कामठी परिसरात मोठ्या प्रमाणात जमीन असल्याचा दावा करण्यात आला होता.

दरम्यान, या व्हिडिओमुळे बावनकुळे यांच्या कुटुंबीयांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागले. नातेवाईक व परिचितांकडून सतत संपर्क साधला जात असल्याने त्यांना अस्वस्थता जाणवू लागल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Gold Rate
Mar 30,2026 – Time 10.26Hrs

Gold 24 KT
₹ 1,50,500 /-

Gold 22 KT
₹ 1,39,500 /-

Silver/Kg
₹ 2,33,300/-

Platinum
₹ 90,000/-

Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तसेच, ३१ मार्च ते ३ एप्रिलदरम्यान आरोपीने वारंवार सोशल मीडियावर पोस्ट करत कुटुंबीयांची वैयक्तिक माहिती गोळा करून प्रसारित केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

उशिराने तक्रार दाखल का?
व्हिडिओतील माहितीची पडताळणी आणि आवश्यक पुरावे गोळा करण्यासाठी वेळ लागल्याने तक्रार उशिराने नोंदवण्यात आल्याचे तक्रारदाराने स्पष्ट केले आहे.

पुढील कारवाई सुरू :
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत बदनामी आणि छळाशी संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

GET YOUR OWN WEBSITE

FOR ₹9,999

Domain & Hosting FREE for 1 Year

No Hidden Charges

Advertisement

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)