Nagpur

दहावी-बारावीचा निकाल कसा पाहायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया


Advertisement

नागपूर – दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपून आता जवळपास महिना उलटला असून विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मे किंवा जून महिन्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, अधिकृत तारीख अद्याप घोषित झालेली नाही.

निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आपला निकाल ऑनलाइन पद्धतीने सहज पाहू शकतात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर हा निकाल उपलब्ध होणार आहे. त्यामुळे संबंधित वेबसाईट्स आधीच सेव्ह करून ठेवणे फायदेशीर ठरेल.

निकाल कुठे पाहता येईल?

Gold Rate
Mar 30,2026 – Time 10.26Hrs

Gold 24 KT
₹ 1,50,500 /-

Gold 22 KT
₹ 1,39,500 /-

Silver/Kg
₹ 2,33,300/-

Platinum
₹ 90,000/-

Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

निकाल जाहीर झाल्यानंतर खालील अधिकृत संकेतस्थळांवर तो पाहता येईल-
mahahsscboard.in
mahresult.nic.in
sscresult.mkcl.org
hscresult.org

ऑनलाइन निकाल पाहण्याची प्रक्रिया-

सर्वप्रथम दिलेल्या संकेतस्थळांपैकी कोणत्याही एका संकेतस्थळावर भेट द्या.
यानंतर ‘SSC Result’ (दहावी) किंवा ‘HSC Result’ (बारावी) हा पर्याय निवडा.
त्यानंतर तुमचा सीट नंबर (रोल नंबर) टाका.
यानंतर आईचे नाव नमूद करा.
ही माहिती भरल्यानंतर ‘View Result’ किंवा ‘Submit’ या बटणावर क्लिक करा.
त्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
विद्यार्थ्यांना त्यांची ई-मार्कशीट डाउनलोड करण्याचाही पर्याय उपलब्ध असेल. निकालाच्या दिवशी वेबसाइट्सवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असण्याची शक्यता असल्याने संयम ठेवून प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

GET YOUR OWN WEBSITE

FOR ₹9,999

Domain & Hosting FREE for 1 Year

No Hidden Charges

Advertisement

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)