Nagpur

पाटणसावंगीतील हॉटेलवर सावनेर पोलिसांची धाड; तीन महिलांना ताब्यात; पुरुष ग्राहक पसार



सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला असून, सावनेर पोलिसांनी एका संशयित हॉटेलवर टाकलेल्या धाडीत अनैतिक प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पांडुरंग रोडलगत सावनेर रोडवरील हॉटेल एस.पी. येथे सुरू असलेल्या संशयास्पद हालचालींबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

या धाडीत पोलिसांनी तीन महिलांना ताब्यात घेतले असून, हॉटेलमध्ये उपस्थित असलेले काही पुरुष मात्र पोलिसांची चाहूल लागताच मागच्या दरवाजाने पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

मागील अनेक दिवसांपासून या हॉटेलमध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये होती. काही सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनीही या प्रकरणाकडे लक्ष वेधले होते. विशेष म्हणजे, वरिष्ठ पत्रकार रविकांत कांबळे यांनी यापूर्वीच या ठिकाणी सुरू असलेल्या गैरप्रकारांबाबत सातत्याने वृत्तांकन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्या वृत्तांनंतरही काही दिवस संबंधित प्रकार सुरूच असल्याचे बोलले जात होते.

Gold Rate
May 14- 2026 – Time 10.30Hrs

Gold 24 KT
₹ 159,100 /-

Gold 22 KT
₹ 1,48,000 /-

Silver/Kg
₹ 2,70,400/-

Platinum
₹ 88,000/-

Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, नागपूर ग्रामीण पोलिस, एलसीबीचे अधिकारी, स्थानिक बीट मार्शल आणि विशेष पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी हॉटेल परिसराची तपासणी करत काही संशयित बाबींची नोंद घेतली असून, पुढील चौकशी सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील काही दलाल आणि संबंधित व्यक्ती गुन्हा नोंद होऊ नये यासाठी हालचाली करत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मात्र, पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहत कारवाईचा वेग वाढवल्याचे समजते.

पाटणसावंगी परिसरातील या कारवाईमुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील वाढत्या अनैतिक व्यवसायांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.

— रविकांत कांबळे, स्पेशल रिपोर्ट

Advertisement

GET YOUR OWN WEBSITE

FOR ₹9,999

Domain & Hosting FREE for 1 Year

No Hidden Charges

Advertisement

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)