Nagpur

आमराई मधील ३०० वर्ष जुनी ऐतिहासिक वैभव असलेल्या भोसलेकालीन विहीरीची मनपा ने घेतली दखल


Advertisement

मनपा स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी तसेच नगरसेवक अमोल श्यामकुळे, ईश्वर ढेंगळे , लक्ष्मीनगर झोन चे उपायुक्त श्री जाधव आणि अग्निशमन प्रमुख श्री बारापात्रे ह्यांची संयुक्त पाहणी

मनपा स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी ह्यांनी ह्या विहिरीला लवकरात लवकर पुनर्जीवन व संवर्धन करण्याचे दिले निर्देश्

नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरालगत (ओल्ड एअरपोर्ट रोड) सोनेगाव– आमराई मार्गाजवळ असलेली 300 वर्ष भोसलेकालीन ऐतिहासिक विहीर जी दुर्लक्षामुळे जर्जर अवस्थेत पोहोचली आहे त्याची अखेर नागपूर महानगर पालिकेने आज दखल घेतली असून मनपा स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी तसेच नगरसेवक अमोल श्यामकुळे , ईश्वर ढेंगळे तसेच लक्ष्मीनगर झोन चे उपायुक्त श्री जाधव आणि अग्निशमन प्रमुख श्री बारापात्रे व अग्निशमन विभाग चमू ह्यांनी संयुक्त पाहणी दौरा केला.

Gold Rate
May 02- 2026 – Time 10.30Hrs

Gold 24 KT
₹ 1,50,800 /-

Gold 22 KT
₹ 1,40,200 /-

Silver/Kg
₹ 2,51,300/-

Platinum
₹ 90,000/-

Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर चे राजे रघुजी भोंसले ज्याचे काळात बांधण्यात आलेली ही विहीर सुमारे ३०० वर्ष जुनी असल्याचे मानले जाते आणि एकेकाळी नियोजनबद्ध जलव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग होती… मात्र आज ही विहीर कचरा, प्लास्टिक आणि शेवाळ्याने तसेच दारू आणि बियर च्या बाटल्या ह्यांनी भरून आपली ऐतिहासिक ओळख गमावत आहे.

या विहिरीच्या परिसरात एक प्राचीन हनुमान मंदिर तसेच श्रीकृष्ण मंदिर आणि हिरवाईने नटलेला संपूर्ण परिसर असल्याने तिचे ऐतिहासिक व पर्यावरणीय महत्त्व अधिक वाढते.

वस्तीपासून काही अंतरावर असूनही येथे दररोज अनेक नागरिक सकाळ , दुपार आणि संध्याकाळी मॉर्निंग तसेच इव्हिनिंग वॉलक साठी येतात.

विशेषतः तरुण येथे पिकनिक, वाढदिवस साजरे करणे तसेच छोटे कार्यक्रम आयोजित करतात. मात्र त्यानंतर कचरा आणि प्लास्टिक विहिरीत व परिसरात टाकल्यामुळे तिची अवस्था अधिकच बिकट होत आहे. ह्या तरुणाई ला विनंती आहे त्यांनी ह्या परिसरात येऊन कार्यक्रम नक्की करावे पण जाताना आपण आणलेल्या पाणी बॉटल्स, प्लास्टिक पिशव्या आणि तत्सम वस्तू ह्यांची परत जाताना योग्य विल्हेवात लावावी.

उल्लेखनीय आहे के ह्या
विहिरीची रचना देखील आता धोकादायक होत चालली आहे. तिच्या भिंतींचे अनेक भाग कोसळले असून विहिरीत खाली उतरण्यासाठी दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत, ज्या पारंपरिक वास्तुकलेचा महत्त्वाचा भाग आहेत. दगडी बांधकाम आणि रचना पाहता तिची प्राचीनता आणि भोसलेकालीन बांधकामशैली स्पष्ट दिसून येते.

ह्या भागात दररोज मॉर्निंग आणि इव्हनिंग वॉक आणि व्यायाम करणारे नागरिक तसेच टेलिकॉम नगर महिला मंडळ , प्रताप नगर न्युज ग्रुप , नागपूर माय लव्ह आणि ग्रीन नागपूर ग्रुप , जनशक्ती मंच चे सर्व सदस्य ह्यांनी पत्रकार व समाजसेवक सचिन द्रवेकर ह्यांचे नैतृत्वात हा मुद्दा पुढे आणत जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि संबंधित विभागांकडे विहिरीच्या पुनर्जीवन व संवर्धनासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. शिवानी दाणी आणि सचिन द्रवेकर ह्यांनी सांगितले की, विहीर पुनर्जीवित केल्यास तिचे पाणी आसपासच्या झाडे व आमराई परिसर संवर्धनासाठी तसेच विमानतळ परिसरातील बागांच्या सिंचनासाठी उपयोगात आणता येईल. आपत्कालीन परिस्थितीतही ती पर्यायी जलस्रोत म्हणून उपयुक्त ठरू शकते…

GET YOUR OWN WEBSITE

FOR ₹9,999

Domain & Hosting FREE for 1 Year

No Hidden Charges

Advertisement

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)