Nagpur

महाराष्ट्रात 21 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; नागपूरचे डीसीपी निकेतन कदम अमरावती ग्रामीणचे एसपी!


Advertisement

मुंबई : राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेत मोठा फेरबदल करत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने तब्बल 21 आयपीएस आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. 30 एप्रिल 2026 रोजी काढण्यात आलेल्या या आदेशामुळे विविध जिल्हे, मुंबई शहर तसेच महत्त्वाच्या विशेष युनिट्समध्ये नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

या फेरबदलात अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली असून प्रशासन अधिक सक्षम करण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जालना येथून अजय के. बन्सल यांची सायबर विभागात नियुक्ती करण्यात आली आहे, तर बाळासाहेब पाटील यांची नाशिक ग्रामीणवरून धुळे येथे बदली झाली आहे. सोमनाथ घार्गे यांना अहमदनगर (अहिल्यानगर) येथून पोलीस महासंचालक कार्यालयात सहायक पोलीस महानिरीक्षक म्हणून नेमण्यात आले आहे.

Gold Rate
Apr 30- 2026 – Time 10.30Hrs

Gold 24 KT
₹ 1,49,400 /-

Gold 22 KT
₹ 1,38,900 /-

Silver/Kg
₹ 2,38,200/-

Platinum
₹ 90,000/-

Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तसेच रविंद्रसिंह परदेशी यांची परभणीवरून राज्य गुप्तवार्ता विभागात बदली करण्यात आली असून संदीप घुगे यांना गुप्तवार्ता विभागातून मुंबई येथे पोलीस उप आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे. मुम्मका सुदर्शन यांची चंद्रपूरवरून अहिल्यानगर येथे बदली झाली आहे.

नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी धोडोंपत स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली असून अनुज तारे यांना पुणे येथील अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समध्ये जबाबदारी देण्यात आली आहे. अश्विनी सानप यांना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकपद सोपवण्यात आले आहे.
दरम्यान, तेगबीर सिंह संधू (जालना), राजकुमार शिंदे (लोहमार्ग पुणे), निकेश खाटमोडे (वाशिम), आयुष नोपानी (चंद्रपूर), पंकज कुमावत (परभणी) यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

नागपूरसाठी महत्त्वाची बदली
या आदेशात नागपूर शहरासाठी विशेष लक्षवेधी बदल करण्यात आला आहे. परिमंडळ-5 चे पोलीस उप आयुक्त निकेतन कदम यांची अमरावती (ग्रामीण) येथील पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

निकेतन कदम यांनी नागपूरमध्ये कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी नियंत्रण आणि विशेष मोहिमा राबवण्यात उल्लेखनीय कामगिरी केली होती. संवेदनशील प्रकरणांच्या हाताळणीत त्यांनी प्रभावी नेतृत्व दाखवले होते.

गृह विभागाने या सर्व बदल्या कायदा व सुव्यवस्था, आगामी प्रशासकीय गरजा आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ नव्या पदांचा कार्यभार स्वीकारावा, असे निर्देश पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहेत.

GET YOUR OWN WEBSITE

FOR ₹9,999

Domain & Hosting FREE for 1 Year

No Hidden Charges

Advertisement

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)