Nagpur

नागपुरात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा एल्गार; संविधान चौकावर जोरदार आंदोलन


Advertisement

नागपूर : राज्यातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज नागपूरात सरकारी तसेच निमसरकारी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जोरदार आंदोलन छेडले. सरकारी-निमसरकारी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांच्या नेतृत्वाखाली हजारो कर्मचारी संविधान चौकात एकवटले.

आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर सरकारकडून ठोस निर्णय घेतला जात नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

Gold Rate
Apr 22 2026 – Time 10.30Hrs

Gold 24 KT
₹ 1,53,400 /-

Gold 22 KT
₹ 1,42,700 /-

Silver/Kg
₹ 2,51,000/-

Platinum
₹ 90,000/-

Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणे, वेतनातील विसंगती दूर करणे, तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करणे या मुद्द्यांचा समावेश आहे. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.

दरम्यान, या बेमुदत संपामुळे राज्यातील शासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांना विविध शासकीय सेवांमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

GET YOUR OWN WEBSITE

FOR ₹9,999

Domain & Hosting FREE for 1 Year

No Hidden Charges

Advertisement

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)