Nagpur

नागपुरात रणजी स्पर्धेत संधीचे आमिष; दोन तरुण क्रिकेटपटूंना २० लाखांचा गंडा


Advertisement

नागपूर : प्रतिष्ठित रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळण्याची संधी मिळवून देण्याचे आमिष दाखवत दोन तरुण क्रिकेटपटूंना तब्बल २० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सोनेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपी काझी झीशान अहमद हा अनंत नगर परिसरात राहणारा असून मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. तो एका क्रीडा प्रशिक्षण संस्थेशी संबंधित असल्याची माहिती पुढे आली आहे.

Gold Rate
Apr 21 2026 – Time 10.30Hrs

Gold 24 KT
₹ 1,53,800 /-

Gold 22 KT
₹ 1,43,000 /-

Silver/Kg
₹ 2,53,100/-

Platinum
₹ 90,000/-

Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

समाजमाध्यमातून ओळख, विश्वासात घेऊन जाळं-
तक्रारदार कोल्लू वीरा वेंकट फनिंद्र कुमार (वय २७), रा. विजयवाडा (आंध्र प्रदेश) यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांनी समाजमाध्यमावर आरोपीचा क्रिकेटचा व्हिडिओ पाहिला आणि त्याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर जून २०२३ मध्ये ते नागपुरात आले आणि मिहान येथील DY Patil Sports Academy येथे आरोपीची भेट घेतली.

या भेटीत आरोपीने दुसऱ्या राज्याच्या संघातून रणजी स्पर्धेत संधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

‘संघात जागा मिळवून देतो’ म्हणत पैशांची मागणी-
ऑक्टोबर २०२३ मध्ये आरोपी विजयवाड्यात जाऊन तक्रारदाराच्या कुटुंबीयांना भेटला. त्याने संघात जागा मिळवून देण्यासाठी १४ लाख रुपये लागतील, असे सांगितले. याचदरम्यान तक्रारदाराचा मित्र राजाकुंटला मुनींद्र (वय २४), रा. नंद्याल यालाही अशाच प्रकारे आमिष दाखवण्यात आले.

दोघांनीही आरोपीवर विश्वास ठेवून वेगवेगळ्या हप्त्यांत पैसे पाठवले. एकूण २० लाख २ हजार रुपये आरोपीच्या खात्यात जमा करण्यात आले.

संधी नाही, पैसेही परत नाही-
पैसे दिल्यानंतरही दोघांनाही कोणतीही संधी मिळाली नाही. वारंवार विचारणा करूनही आरोपीने टाळाटाळ केल्याने अखेर फसवणुकीचा प्रकार उघड झाला.

पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला असून, अशा आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

GET YOUR OWN WEBSITE

FOR ₹9,999

Domain & Hosting FREE for 1 Year

No Hidden Charges

Advertisement

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)