Nagpur

भंडाऱ्यात भीषण अपघात; काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे थोडक्यात बचावले, फॉर्च्युनरचे मोठे नुकसान!


Advertisement

भंडारा: सोमवारी पहाटे भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक अपघात घडला असून काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या गाडीला ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात पडोळे किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार प्रशांत पडोळे हे आपल्या सहकाऱ्यांसह भंडाऱ्यावरून नागपूरकडे विमानतळाच्या दिशेने निघाले होते. दिल्ली येथे सुरू असलेल्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी ते जात असताना रस्त्यात अचानक एका ट्रकने त्यांच्या फॉर्च्युनर कारला धडक दिली.

Gold Rate
Mar 30,2026 – Time 10.25Hrs

Gold 24 KT
₹ 1,45,500 /-

Gold 22 KT
₹ 1,35,300 /-

Silver/Kg
₹ 2,29,600/-

Platinum
₹ 90,000/-

Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या धडकेत गाडीच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले असून वाहनाचा चक्काचूर झाला आहे. मात्र अपघातानंतर पडोळे सुरक्षित असून त्यांना केवळ किरकोळ दुखापत झाली आहे.

विशेष म्हणजे, याच मार्गावर यापूर्वीही अशाच प्रकारचे अपघात घडले असल्याने या रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

GET YOUR OWN WEBSITE

FOR ₹9,999

Domain & Hosting FREE for 1 Year

No Hidden Charges

Advertisement

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)