Nagpur

नागपुरात भरदिवसा घरफोडीचा गुन्हा उघड; चार आरोपी जेरबंद, ४.२० लाखांचा मुद्देमाल जप्त


Advertisement

नागपूर : शहरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या भरदिवसा घरात घुसून केलेल्या धाडसी चोरीचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखा युनिट-२ला मोठे यश आले आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून कार आणि मोबाईल असा एकूण ४.२० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही घटना ३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १.२० वाजण्याच्या सुमारास दाभा येथील वेलकम सोसायटी, प्लॉट क्रमांक ५६ येथे घडली. फिर्यादी सतीश परमेेश्वर गडपायले (वय ५३) हे कामानिमित्त बाहेर गेले असताना त्यांचा १७ वर्षीय मुलगा श्रेयस हा घरी एकटाच होता. याच संधीचा फायदा घेत आठ अज्ञात आरोपी स्विफ्ट कार आणि दुचाकीवरून आले. त्यांनी जबरदस्तीने घरात प्रवेश करत मुलाला चाकूचा धाक दाखवला.

Gold Rate
Apr 06,2026 – Time 10.30Hrs

Gold 24 KT
₹ 1,49,000 /-

Gold 22 KT
₹ 1,38,600 /-

Silver/Kg
₹ 2,35,500/-

Platinum
₹ 90,000/-

Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकी देत कपाटातील सुमारे ४० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि तेथून पळ काढला. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा नोंदवला.

दरम्यान, गुन्हे शाखा युनिट-२ने समांतर तपास सुरू ठेवत सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितांचा माग काढला. तपासादरम्यान संदीप भोजराज ठाकरे (२३), सुमित पंजाब उईके (२३), ऋषभ राजकुमार वैश्य (२४) आणि निखिल आनंद पाटील (२२) या चौघांना अटक करण्यात आली.

पोलीस चौकशीत आरोपींनी इतर साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली असून काही आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार आणि मोबाईल फोन असा एकूण ४.२० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख आणि त्यांच्या पथकाने केली असून पुढील तपास गिट्टीखदान पोलीस करत आहेत.

GET YOUR OWN WEBSITE

FOR ₹9,999

Domain & Hosting FREE for 1 Year

No Hidden Charges

Advertisement

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)