नागपूरात थरारक घटना; १६ वर्षीय मुलाचे अपहरण, बेल्टने निर्दयी मारहाण

नागपूर – शहरातील सीताबर्डी पोलीस ठाणे हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मैत्रीच्या नावाखाली १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला जाळ्यात ओढून त्याचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर एका बंद खोलीत बेल्टने अमानुष मारहाण करण्यात आली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ तयार करून त्याद्वारे धमकी देण्याचाही प्रकार समोर आला आहे.
माहितीनुसार, पीडित मुलगा आपल्या एका महिला मैत्रिणीच्या संपर्कात होता. याच ओळखीचा गैरफायदा घेत आरोपींनी त्याला जबरदस्तीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला कारमध्ये बसवून मोमिनपुरा परिसरात नेण्यात आले. येथे एका खोलीत त्याला डांबून ठेवत तासन्तास निर्दयी मारहाण करण्यात आली.
या घटनेत विशेष धक्कादायक बाब म्हणजे, मारहाण सुरू असतानाच एक आरोपी मोबाईलवर संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण करत होता. या व्हिडिओचा वापर करून पीडिताला धमकावणे किंवा ब्लॅकमेल करण्याचा हेतू असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्राथमिक तपासात समोर आले आहे की, किरकोळ वादातून हा प्रकार घडला. पीडिताने आपली लोकेशन चुकीची सांगितल्याच्या कारणावरून आरोपी संतप्त झाले आणि त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
घटनेनंतर पीडिताने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरण, मारहाण आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या सर्व आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे नागपूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
The original article was published on %%sitedesc%%. Read more: %%permalink%%
