Nagpur

नागपुरात बनावट सोन्याच्या दागिन्यांचा मोठा घोटाळा; दोन ऑडिटरला अटक, तपास अधिक तीव्र


Advertisement

नागपूर : बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याचा भास निर्माण करून बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार नागपुरात उघड झाला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दोन ऑडिटरना अटक केली असून तपासाची दिशा आता अधिक वेगाने पुढे सरकत आहे.

धंतोली पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या गुन्ह्यानुसार, आयसीआयसीआय बँकेचे झोनल प्रमुख धनंजय रमेश थिटे यांनी याबाबत तक्रार दिली होती. तपासात उघड झाल्यानुसार, जानेवारी २०२३ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ही फसवणूक पद्धतशीरपणे करण्यात आली.

Gold Rate
Apr 09,2026 – Time 10.30Hrs

Gold 24 KT
₹ 1,50,700 /-

Gold 22 KT
₹ 1,40,200 /-

Silver/Kg
₹ 2,39,500/-

Platinum
₹ 90,000/-

Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनिषनगर येथील शाखेत गोल्ड कर्जाची तपासणी करताना दागिन्यांबाबत शंका निर्माण झाली. सखोल ऑडिटमध्ये अनेक सोन्याचे पॅकेट प्रत्यक्षात बनावट असल्याचे समोर आले. पुढील तपासात शहरातील ९ शाखांमधील तब्बल १५९ पॅकेट बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणात व्हॅल्युअर, ऑडिटर आणि काही खातेदारांनी एकत्रितपणे कट रचून बनावट दागिन्यांवर कर्ज उचलल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकारामुळे बँकेची सुमारे २३ कोटी १९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

या घोटाळ्यात प्रमोद भैयाजी टेटे आणि राजेंद्र पुंडलिकराव शिळनकर या दोन ऑडिटरना ९ एप्रिल २०२६ रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, चौकशीतून आणखी महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त दीपक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष तोकलवाड व त्यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून, पुढील काही दिवसांत आणखी अटक होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

GET YOUR OWN WEBSITE

FOR ₹9,999

Domain & Hosting FREE for 1 Year

No Hidden Charges

Advertisement

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)