नागपूरच्या एमआयडीसी परिसरात युट्यूबरवर हल्ला; अतिक्रमण प्रकरणाचे चित्रीकरण करताना मारहाण

नागपूर : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शांतिनगर झोपडपट्टी परिसरात एका युट्यूबरवर काही जणांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. अतिक्रमणाच्या प्रकरणाचे चित्रीकरण करत असताना ही मारहाण करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष कात्रे हे माजी सरपंच असून ते युट्यूब चॅनेल चालवतात. २९ मार्च रोजी अक्षय मेश्राम नावाच्या व्यक्तीने अतिक्रमणाच्या प्रयत्नाबाबत माहिती दिल्यानंतर कात्रे घटनास्थळी पोहोचले.
तेथे सुरू असलेल्या प्रकाराचे चित्रीकरण करत असताना सिद्धार्थ बागडे, राहुल कुलसंगे आणि मिलिंद प्रधान यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात कात्रे यांना मारहाण करण्यात आली असून त्यांना दुखापत झाली आहे. घटनेनंतर एमआयडीसी पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Advertisement




