Nagpur

गिरीधर देशमुख, नरेश डोंगरे व मोहन अटाळकर यांना २०२५ चे स्वर्गीय अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार जाहीर


Advertisement

नागपूर : विदर्भ गौरव प्रतिष्ठान, नागपूर आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मागील चार दशकांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पत्रकारांचा ‘स्वर्गीय अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येतो.

स्वर्गीय अनिलकुमार हे स्वातंत्र्यपूर्व काळातील ज्येष्ठ कवी, विचारवंत आणि पत्रकार म्हणून परिचित होते. स्वातंत्र्य चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य आजही प्रेरणादायी मानले जाते. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो.

Gold Rate
June 19 ,2026 – Time 10.30Hrs

Gold 24 KT
₹ 1 44,600 /-

Gold 22 KT
₹ 1,34,200 /-

Silver/Kg
₹ 2,29,300/-

Platinum
₹ 88,000/-

Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावर्षीचा २०२५ चा स्वर्गीय अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार व दैनिक कॅलिफोर्निया टाईम्सचे मुख्य संपादक गिरीधर भिमरावजी देशमुख (वरूड, जि. अमरावती), दैनिक लोकमतचे उपमुख्य संपादक नरेश गणपतराव डोंगरे (नागपूर) तसेच दैनिक लोकसत्ता (विदर्भ विभाग) चे विशेष प्रतिनिधी मोहन मनोहर अटाळकर (अमरावती) यांना जाहीर करण्यात आला आहे.

गिरीधर देशमुख यांना पत्रकारितेतील तब्बल ४८ वर्षांचा अनुभव असून त्यांनी ग्रामीण व सामाजिक विषयांवरील पत्रकारितेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. नरेश डोंगरे हे गेल्या ३४ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असून सध्या दैनिक लोकमतमध्ये उपमुख्य संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच मोहन अटाळकर यांनीही प्रदीर्घ काळ पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करत विदर्भातील विविध प्रश्नांवर प्रभावीपणे लेखन केले आहे.

Advertisement

या पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये २१,०००, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे आहे.

हे पुरस्कार स्वर्गीय अनिलकुमार यांच्या स्मृतिदिनी, १३ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहेत.

अमरावती जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार गिरीधर देशमुख आणि मोहन अटाळकर यांचा या पुरस्कारासाठी सन्मान होत असल्याने विदर्भातील सर्व वृत्तपत्रांच्या आवृत्त्यांमधून या वृत्ताला प्रसिद्धी द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Advertisement

GET YOUR OWN WEBSITE

FOR ₹9,999

Domain & Hosting FREE for 1 Year

No Hidden Charges

Please follow and like us:
error20
fb-share-icon584226
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)