Nagpur

रामनवमी निमित्त नागपुरात भव्य शोभायात्रा; वाहतूक व्यवस्थेत बदल, दुपारी ३ पासून ‘नो पार्किंग’!


Advertisement

नागपूर : रामनवमीच्या पार्श्वभूमीवर शहरातील रामनगर परिसरातून २६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. पश्चिम नागपूर नागरिक संघाच्या वतीने आयोजित या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होण्याची शक्यता असल्याने वाहतुकीवर परिणाम होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध मार्गांवर वाहतूक वळविण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे.

ही शोभायात्रा रामनगर येथील श्री राम मंदिरातून सुरू होऊन लक्ष्मीभवन चौक, कॅफे हाऊस चौक, मामा रोड, झेंडा चौक, लक्ष्मीनारायण मंदिर परिसर, शंकरनगर, बजाजनगर, लक्ष्मीनगर, अभ्यंकर नगर, व्हीएनआयटी गेट, एलएडी कॉलेज चौक अशा प्रमुख मार्गांवरून पुन्हा रामनगर येथे येऊन समाप्त होणार आहे. त्यामुळे या संपूर्ण मार्गावर वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विविध चौकांवरून येणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. काही ठिकाणी डावे-उजवे वळण घेऊन वाहतूक पुढे सोडण्यात येईल, तर काही मार्गांवरून थेट वाहतूक बंद ठेवून पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषतः शंकरनगर, कॅफे हाऊस, बजाजनगर, लक्ष्मीनगर, अभ्यंकर नगर या भागांत वाहतूक नियंत्रण कडक ठेवण्यात येणार आहे.

Gold Rate
Mar 25,2026 – Time 11.05Hrs

Gold 24 KT
₹ 1,45,900 /-

Gold 22 KT
₹ 1,35,700 /-

Silver/Kg
₹ 2,37,600/-

Platinum
₹ 90,000/-

Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, शोभायात्रेच्या मार्गावरील सर्व रस्ते २६ मार्च रोजी दुपारी ३ वाजल्यापासून ‘नो पार्किंग झोन’ घोषित करण्यात आले आहेत. शोभायात्रा संपेपर्यंत हा नियम लागू राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

परिस्थितीनुसार वाहतूक पोलिसांना तातडीने मार्ग बदलण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी लाऊडस्पीकर, स्थानिक वर्तमानपत्रे आणि सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकांद्वारे माहिती देण्यात येणार आहे.

वाहतूक पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे सांगितले आहे.

GET YOUR OWN WEBSITE

FOR ₹9,999

Domain & Hosting FREE for 1 Year

No Hidden Charges

Advertisement

Advertisement



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)