Nagpur

नागपूर महानगरपालिकेत नामकरण समितीची स्थापना; चौक-रस्त्यांना नावे देण्याच्या प्रक्रियेला वेग


Advertisement

नागपूर : शहरातील विविध चौक आणि रस्त्यांना नावे देण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महानगरपालिका ठराव क्रमांक ०९, दिनांक २० मार्च २०२६ अन्वये या कामासाठी विशेष नामकरण समिती गठीत करण्यात आली असून, या समितीच्या स्थापनेचे अधिकार महापौरांना देण्यात आले होते.

त्या अधिकारांचा वापर करून महापौरांनी २० मार्च २०२६ रोजी ही समिती अधिकृतपणे स्थापन केली. या समितीच्या अध्यक्षपदी उपमहापौर लिला अजय हाथीबेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Gold Rate
Apr 09,2026 – Time 10.30Hrs

Gold 24 KT
₹ 1,50,700 /-

Gold 22 KT
₹ 1,40,200 /-

Silver/Kg
₹ 2,39,500/-

Platinum
₹ 90,000/-

Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

समितीमध्ये दिलीप वामनराव दिवे, विद्या राजेश कन्हेरे, रामदास द्वारकाप्रसाद शाहू, चंद्रकांत मनोहर खंगार, दिपक मोहन पटेल आणि आसीफ सादिक शेख यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

शहरातील चौक आणि रस्त्यांना नावे देण्यासाठी नागरिकांकडून येणाऱ्या अर्जांची छाननी करून त्यावर अंतिम शिफारस महानगरपालिकेकडे सादर करण्याची जबाबदारी या समितीकडे असणार आहे. त्यामुळे शहरातील नामकरण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि संघटित पद्धतीने पार पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महापालिका सचिव डॉ. रंजना लाडे यांच्या आदेशान्वये संबंधित सर्व सदस्य आणि अधिकाऱ्यांना या समितीबाबत सूचना देण्यात आल्या असून, बैठकींचे नियोजन आणि अंमलबजावणीची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे नागपूर शहरातील विविध भागांच्या ओळखीला नवे स्वरूप मिळणार असून, स्थानिक नागरिकांच्या भावनांचा सन्मान राखत नामकरणाची प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे.

GET YOUR OWN WEBSITE

FOR ₹9,999

Domain & Hosting FREE for 1 Year

No Hidden Charges

Advertisement

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)