Nagpur

गणेशपेठत घटना, मोमिनपुरा नावाने फुटेज; दोन संपादकांसह रिपोर्टरवर गुन्हा दाखल


नागपूर: गणेशपेठ पोलिस स्टेशन अंतर्गत दोसार भवनजवळ सापडलेल्या संशयास्पद बॅगेत जिलेटिनच्या काड्या आणि डेटोनेटर आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसर सील करत तपास सुरू केला. स्फोटक साहित्य सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र, या गंभीर घटनेदरम्यान समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे प्रकरणाने वेगळेच वळण घेतले. काही वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांनी घटनास्थळाचे फुटेज चुकीच्या ठिकाणाशी जोडत प्रसारित केले. न्यूज एक्सप्रेस आणि न्यूज भारत टीव्ही या चॅनेलवरील रिपोर्टमध्ये हे फुटेज मोमिनपुरा जामा मशीद परिसरातील असल्याचे दाखवण्यात आले.
या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या वृत्तांकनामुळे शहरात तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. विशेषतः मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी मोमिनपुरा येथील साजिद अन्वर विलद अब्दुल वदूत (वय 54) यांनी तहसील पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, संबंधित वृत्तांकन हे केवळ चुकीचे नसून समाजात गैरसमज पसरवणारे आहे.
तक्रारीची दखल घेत पोलिसांनी दोन संपादक आणि संबंधित रिपोर्टरविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला असून तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.

या घटनेमुळे “ब्रेकिंग न्यूज”च्या स्पर्धेत सत्य हरवत चालले आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. संवेदनशील प्रकरणांमध्ये जबाबदारीने आणि पडताळणी करूनच बातमी प्रसारित करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

The original article was published on %%sitedesc%%. Read more: %%permalink%%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)