Nagpur

गडचिरोलीत नक्षलमुक्त मोहिमेच्या शेवटच्या दिवशी मोठी कामगिरी; 9 नक्षलवाद्यांची शरणागती


Advertisement

गडचिरोली : नक्षलविरोधी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात महत्त्वाची घडामोड घडली असून 9 माओवादी नक्षलवाद्यांनी स्वेच्छेने शरणागती पत्करली आहे. यामध्ये 3 एसीएम दर्जाचे वरिष्ठ नक्षलवादी कॅडर असल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उर्वरित नक्षलवादीही दीर्घकाळापासून सक्रिय होते. या सर्वांवर महाराष्ट्र शासनाकडून एकूण 30 लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले होते.

विशेष म्हणजे, दोन नक्षलवादी शरण येताना आपल्या सोबत AK-47 आणि कार्बाईनसारखी अत्याधुनिक शस्त्रे घेऊन आले, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांना मोठा दिलासा मिळाला आहे. नक्षलवाद संपवण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेल्या वेळमर्यादेच्या दिवशीच ही घटना घडल्याने तिचे प्रतीकात्मक महत्त्वही अधोरेखित झाले आहे.

Gold Rate
Mar 30,2026 – Time 10.25Hrs

Gold 24 KT
₹ 1,45,500 /-

Gold 22 KT
₹ 1,35,300 /-

Silver/Kg
₹ 2,29,600/-

Platinum
₹ 90,000/-

Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सातत्यपूर्ण मोहिमा, स्थानिक स्तरावर विश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न आणि पुनर्वसनाच्या धोरणामुळे नक्षलवादी मुख्य प्रवाहात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. 2025 पासून आतापर्यंत 132 सशस्त्र नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, शरण आलेल्या नक्षलवाद्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे छत्तीसगडमध्ये शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याने पुढील कारवायांना अधिक गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

GET YOUR OWN WEBSITE

FOR ₹9,999

Domain & Hosting FREE for 1 Year

No Hidden Charges

Advertisement

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)