Nagpur

नागपूरात रंगणार ‘ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळावा’; कला, संस्कृतीसह खाद्यसंस्कृतीचा भव्य उत्सव!


Advertisement

नागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारा ‘ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळावा व लोकनृत्य महोत्सव’ यंदा 27 मार्च ते 5 एप्रिल 2026 या कालावधीत पार पडणार आहे. या राष्ट्रीय स्तरावरील महोत्सवाचे हे 32 वे वर्ष असून देशभरातील कलाकार आणि शिल्पकार यात सहभागी होणार आहेत.

महोत्सवाचे उद्घाटन 27 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे. दररोज दुपारी 2 ते रात्री 9.30 या वेळेत हस्तकला प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहील. तसेच मुख्य मंचावर सायंकाळी 6.30 वाजल्यापासून विविध राज्यांतील लोकनृत्यांचे सादरीकरण होईल.

Gold Rate
Mar 25,2026 – Time 11.05Hrs

Gold 24 KT
₹ 1,45,900 /-

Gold 22 KT
₹ 1,35,700 /-

Silver/Kg
₹ 2,37,600/-

Platinum
₹ 90,000/-

Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या मेळाव्यात सुमारे 150 हून अधिक हस्तशिल्पकार आणि 300 पेक्षा अधिक लोक व आदिवासी कलाकार सहभागी होणार आहेत. देशातील विविध भागांतील पारंपरिक नृत्य, संगीत, हस्तकला आणि खाद्यसंस्कृती यांचा संगम येथे अनुभवता येणार आहे.

27 ते 30 मार्चदरम्यान गुजरातचा बेडा रास, उत्तर प्रदेशातील डेढिया नृत्य, राजस्थानचा सेहरिया स्वांग, आंध्र प्रदेशातील वीर नाट्यम, गोव्याची घोडे मोडणी, मध्य प्रदेशातील गुदुम बाजा आणि मणिपूरचा लाई हरोबा नृत्य सादर होणार आहे.

31 मार्च रोजी दिव्यांग मुलांकडून ‘दिव्यरंग दिव्यांगांचे’ हा विशेष कार्यक्रम सादर केला जाईल. त्यानंतर दिल्लीच्या गायिका प्रियंका अहिरवार यांचे लोकसंगीत व भजन होईल. 1 एप्रिल रोजी कबीर गायन तसेच ट्रान्सजेंडर कलाकारांकडून महाराष्ट्रातील लोकनृत्यांची प्रस्तुती होणार आहे.

2 ते 5 एप्रिलदरम्यान सिध्दी धमाल, लाल आंगी गेर, माथुरी नृत्य, ढोलु कुनिथा, छाऊ नृत्य आणि बोरो नृत्य अशा विविध लोकनृत्यांची रेलचेल राहील.

मेळावा परिसरात बहुरूपी कलाकार, कच्छी घोडी नृत्य, कठपुतली, बायस्कोप तसेच टेराकोटा कलेचे थेट प्रात्यक्षिक हे आकर्षण ठरणार आहे. विविध राज्यांतील शिल्पकारांनी तयार केलेल्या वस्तूंची प्रदर्शनी आणि विक्रीही येथे होणार आहे.

हँडलूम, बनारसी साड्या, चिकनकारी, फुलकारी, जरीकाम, दागिने, मेटल क्राफ्ट, गालिचे, मंडला आर्ट यांसारख्या विविध कलाकृती उपलब्ध राहतील. खाद्यप्रेमींसाठी राजस्थानी, पंजाबी, दिल्ली चाट, तंदुरी चहा, कुल्फी तसेच विदर्भातील पारंपरिक पदार्थांची मेजवानी मिळणार आहे.
मेळाव्यादरम्यान देशपांडे सभागृह येथे सशुल्क पार्किंगची सुविधा उपलब्ध राहील. प्रवेशासाठी प्रति व्यक्ती 30 रुपये देणगी स्वरूपात शुल्क ठेवण्यात आले आहे.

या भव्य सांस्कृतिक मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी नागरिकांना केले आहे.

GET YOUR OWN WEBSITE

FOR ₹9,999

Domain & Hosting FREE for 1 Year

No Hidden Charges

Advertisement

Advertisement



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)