Nagpur

नागपुरात भीषण अपघात; अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू


Advertisement

नागपूर : कामठी परिसरात झालेल्या एका भीषण अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामठी-नागपूर मार्गावरील भेंडीखाना परिसरात घडली.

मृत व्यक्तीची ओळख कार्तिक राजाना अरगुल्लेवार (वय ५९, रा. शास्त्री मंच, कामठी) अशी झाली आहे. ते साऊथ ईस्ट सेंटर रेल्वे, मोतीबाग (नागपूर) येथे टेक्निशियन ग्रेड-१ पदावर कार्यरत होते. तसेच ते एक नामांकित हॉकी खेळाडू म्हणूनही ओळखले जात होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अरगुल्लेवार हे आपली अ‍ॅक्टिवा (MH-40/BR-3803) घेऊन ड्युटी आटोपून नागपूरहून कामठीकडे जात होते. दरम्यान, भेंडीखाना परिसरात मागून येणाऱ्या एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला.

Gold Rate
Mar 25,2026 – Time 11.05Hrs

Gold 24 KT
₹ 1,45,900 /-

Gold 22 KT
₹ 1,35,700 /-

Silver/Kg
₹ 2,37,600/-

Platinum
₹ 90,000/-

Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जखमी अवस्थेत त्यांना तातडीने कामठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

GET YOUR OWN WEBSITE

FOR ₹9,999

Domain & Hosting FREE for 1 Year

No Hidden Charges

Advertisement

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)